ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

महापालिका अधिनियम कलम ! कल्याण - डोंबिवली महानगर पालिका आमलात आणणार की पुस्तकातच राहणार ?


  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 12/2/2020 9:51:07 AM

महापालिका अधिनियम कलम !  
कल्याण - डोंबिवली महानगर पालिका आमलात आणणार की पुस्तकातच राहणार ? 

३९८ अ नुसार दंडात्मक कारवाई करून महापालिका अधिनियमाचे अधिकारी पालन करून इमारतींचे संरचनात्मक निरीक्षण कधी  ?

डोंबिवली : कल्याण - डोंबिवली शहरातील दिवसें दिवस अनाधिकृत बांधकामे वाढत आहेत.इमारत बांधताना नेशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया २००५ नियमाचे वापर होत नाही.हे शहराचे दुर्भाग्य आहे.

शासकीय व खाजगी जागेवरती ३० ते ४० वर्षा पुर्विच्या अनेक इमारती जीर्ण अवस्था मध्ये आहेत. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे इमारती पडून अनेक रहिवाशी बेघर होत आहे.तर काही म्रुत्युमुखी पडत आहे.

महापालिका " महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम" प्रमाणे वर्षेनवर्षे नोटिसा देत आहे पण कलम ३९८ अ तरतुदी नुसार दंडात्मक कारवाई करून त्या इमारतीला  " इमारतीचे संरचनात्मक निरीक्षण " करावयास भाग पाडत नाही.अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

महापालिका अधिनियम १९४९ च्या ६ पोटकलम (५) प्रमाणे  "इमारतीचे संरचनात्मक निरिक्षण" करण्याचे महानगर पालिका आयुक्त आपले अधिकार वापरून करत नाही त्यामुळे अशाजीर्ण इमारतींमधील रहिवाशी यांच्या मानेवर जणू टांगती तलवार आहे अशी परिस्थिती आहे. महापालिकेने " महापालिका अधिनियम" कलम चा वापर करून  " इमारतीचे संरचनात्मक निरीक्षण " करणे गरजेचे आहे.व अशा इमारतींचे पुनर्वसन करण्यासाठी "पुनर्वसन योजना " राबवणे गरजेचे आहे.या कडे महापालिका दुर्लक्ष करत आहे.

Share

Other News