समाज कल्याण विभागाचा अजब गजब कारभार

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 02/03/2021 8:45 AM

सिरोंचा :- 

       सिरोंच्याच्या महिला मुख्याध्यापक कडे गरज नसतानाही चिमूर चा अतिरिक् पदभार या बाबत सविस्तर वृत्त असे की सिरोंचा जि.गडचिरोली येथे समाज कल्याण विभागा मार्फत अनु.जाती.नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा 2013 पासून सुरू करण्यात आली परंतु आजपर्यंत या शाळेला एकही महिला कर्मचारी देण्यात आलेली नाही.सारवासारव करण्यासाठी विभागाने एक महिला मुख्याध्यापिका शाळेवर प्रतिनियुक्तीने नेमली परंतु पुन्हा त्या महिला मुख्याध्यापिकेकडे चिमूर येथील शाळेचा अतिरिक्त पदभार दिला. सिरोंचा सोयीचे नसल्याचे कारण सांगून महिला मुख्याध्यापिका चिमूर येथूनच सिरोंचा शाळेचा कारभार पाहत आहे.सिरोंचा येथे एकही महिला कर्मचारी शाळा आणि हॉस्टेल वर नाही या उलट चिमूर येथे इतर महिला कर्मचारी असूनही त्या शाळेचा अतिरिक्त पदभार सिरोंच्याच्या महिला मुख्याध्यापक कडे देण्याचा अजब गजब कर कारभार प्रादेशिक उपायुक्त नागपूर समाज कल्याण यांनी केला आहे. शाळेवर 19 पदे मंजूर असताना फक्त 4 पदे सिरोंच्याच्या शाळेवर भरलेली आहेत.शाळा मुलींची असूनही त्यांच्या समस्यांकडे विभाग वारंवार दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार समाज कल्याण विभागात घडत आहे. त्यामुळे सिरोंचा येथील मुलींच्या निवासी शाळेवर त्वरित कायमस्वरूपी महिला मुख्याध्यापक अधिक्षिका आणि 2 ते 3 महिला शिक्षकांची भरती करावी आणि सर्व रिक्त पदे तात्काळ भरावी अशी मागणी या शाळेच्या पालकांनी केली आहे. मागणी पूर्ण न केल्यास शाळा बंद आंदोलन करण्याचा आणि मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.








माजिद अली (सिरोंचा तालुका प्रतिनिधी)
8275413143

Share

Other News

ताज्या बातम्या