बोगसगिरीला आळा घालण्यासाठी आता तहसीलदार कार्यालयातच अकृषक आदेश व चलन मिळणार :- चंदनदादा चव्हाण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/03/2021 5:40 PM


*गुंठेवारी नागरिकांना खुशखबर....

          गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीने गेले आठवडाभर सातत्याने तलाठी कार्यालयात अकृषक पावत्या काढून बिनशेती नोंदी धरल्या बाबत नागरिकांना आदेश नसल्याचे त्यांना कर्ज प्रकरण व घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्या बाबत टीकेची झोड उडवली होती. अनेक पत्रकार बंधूनी यावर फोकस केला. त्यामुळे मा तहसीलदार डी एस कुंभार सो, मा अर्चना पाटील सो,  अप्पर तहसीलदार सांगली यांनी याबाबत अकृषक पुस्तके कार्यालयात जमा करून घेऊन ज्या नागरिकांचे अकृषक प्रस्ताव दाखल झालेले आहेत त्यांची 
 प्रकरणे मंजूर करून तिथेच शासकीय अकृषक चलन ऑनलाइन देणेची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे येथून पुढे मात्र शिस्त लागणार आहे शिवाय बोगसगिरी ला आता कायमचा लगाम बसला आहे .

गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती ने मिरज तहसीलदार सो मा अप्पर तहसीलदार सो यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे .

मात्र यापूर्वी च्या तक्रारी या समिती लावून धरून जे लोक फसले आहेत त्यांना मा जिल्हाधिकारी यांचे सोबत बैठक आयोजित करून मार्ग काढावा व संबंधितावर कारवाई व्हावी ही मागणी कायम आहे .

 *चंदनदादा चव्हाण : प्रदेशाध्यक्ष*  
गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती 
भ्रमणध्वनी : 9421245003
दि :०३/०३/२०२१

Share

Other News

ताज्या बातम्या