खाकीची लक्तरे वेशीवर हप्तेखोर पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल! काळी पिवळी चालकाकडून घेतले अडीचशे रुपये

  • स्वप्नील शिंदे (Padali shinde)
  • Upadted: 15/06/2021 7:26 AM

खाकीची लक्तरे वेशीवर 
हप्तेखोर पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल!
काळी पिवळी चालकाकडून घेतले अडीचशे रुपये

पाडळी शिंदे(प्रतिनिधी):-काही लाचखाऊ वृत्तीच्या पोलिसांमुळे पोलिस दलाचे नाव वेळोवेळी बदनाम झाले आहे. एसीबीच्या ट्रपमध्ये लाच घेणारे अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी अडकले आहेत. तरीही हप्तेखोरीची चटक लागलेले भामटे आपली भ्रष्टवृत्ती सोडायला तयार नाहीत. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडुन अंढेरा पोलिस ठाण्याचा एक वाहतूक पोलीस नेहमीच राजरोसपणे हप्ते वसुली करत आला आहे. मात्र,त्याला १३जून रोजी एका काळी पिवळी चालकाने चांगलीच अद्दल घडविली.अडीचशे रुपये घेतांना या हप्तेखोर पोलिसांचे व्हिडीओ चित्रण चालकाने काढले .ही चित्रफीत सर्वत्र व्हायरल झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
   राजू चौधरी असे या वाहतूक पोलिसाचे नाव आहे .चिखली ते देऊळगाव राजा महामार्गावरील वाकी फाट्यावर पोलिसांच्या नकळत मोबाइल मध्ये हा व्हिडीओ काढण्यात आला. वाकी फाट्यावर १३जून रोजी सायंकाळी अंढेरा पोलीस स्टेशनचे पथक वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनावर कारवाई करीत होते. यामध्ये वाहतूक पोलीस राजू चौधरी देखील होते.एका काळी पिवळी वाहन चालकाने मोबाइल कॅमेरा सज्जच ठेवला होता. तो वाहनातून उतरल्यापासून पैसे देऊन परत वाहनात बसेपर्यंत जवळपास तीन मिनिटांचा हा व्हिडीओ आहे .वाहतूक पोलिसांकडे जात असताना बाजूला दुय्यम ठाणेदार दिसतात.त्यांना संशय येऊ नये म्हणून पोलीस हप्त्याविषयी बोलत पुढे चालत जातो .चारशे रुपये हप्ता द्या ;अन्यथा कारवाई करेन ,असे बोलतो त्याच वेळी चालक अडीचशे रुपये काढून हातावर टेकवतो आणि पोलीस पैसे खिशात घालतो हे सगळे चित्रण त्यामध्ये रेकॉर्ड झाले आहे हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत.वर्षभरापूर्वी चिखली देऊळगाव राजा मार्गावरील मेहकर फाटा येथे ट्रक चालक व वाहतूक पोलीस यांचा असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता .त्या पोलिसाला निलंबित करण्यात आले होते. आता पोलिस अधीक्षक या पोलिसावर काय कारवाई करतात ,याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

"त्या व्हिडीओच्या अनुषंगाने चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल .
              राजवंत आठवले
           ठाणेदार,अंढेरा

Share

Other News

ताज्या बातम्या