*करोनाकाळात महागडय़ा वाहनांची खरेदी तेजीत*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 01/08/2021 4:29 PM

   ⭕२० लाखांपेक्षा जास्त किमतीच्या ४,८८६ वाहनांची नोंद ........ 

 मुंबई : कडक निर्बंध आणि आर्थिक मंदी यांमुळे करोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली,
 तर काहींच्या वेतनात कपात झाली.
 असे असतानाही करोनाकाळात मुंबईत वाहन खरेदी तेजीत होती. 
मुंबईत अनेकांनी महागडय़ा वाहनांची खरेदी झाली असून या काळात २० लाख रुपयांहून अधिक किमतीच्या चार हजार ८८६ वाहनांची नोंद आर.टी.ओ.त झाली. 
मुंबईतील चार आर.टी.ओं.पैकी ताडदेव आर.टी.ओ.त सर्वाधिक महागडय़ा गाडय़ांची नोंद असून तुलनेत वडाळा आर.टी.ओ.त कमी नोंदणी झाली. 
एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली आर.टी.ओ.त मिळून तीन हजार ६७९ आलिशान व महागडय़ा गाडय़ांची नोंदणी झाली आहे, 
तर याच किमतीच्या एक हजार २०७ वाहनांची नोंदणी एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ पर्यंत झाली. 
या सर्व महागडय़ा गाडय़ांची रक्कम २० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे आर.टी.ओ.तील अधिकाऱ्यांनी सांगितले. 
नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर १३ टक्के  आणि त्यापेक्षा जास्त वाहन कर आकारण्यात आला आहे. 
त्यामुळे चारही आर.टी.ओ.च्या तिजोरीतही मोठय़ा महसुलाची भर पडली आहे.
 मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती स्कोडा, फॉक्सवॅगन या वाहनांना दिली आहे. 
त्यापाठोपाठ मर्सिडीज,
 फेरारी, टोयाटो, जॅग्वार, लॅण्ड रॉवर, बी.एम.डब्ल्यू., पोर्शे जर्मनी, रोल्स रॉयस, ऑडी, व्हॉल्वो इत्यादी कंपन्यांच्या वाहनांच्या खरेदीकडेही मुंबईकरांचा कल आहे. 
एप्रिल २०२० ते जुलै २०२१ पर्यंत वडाळा आर.टी.ओ.त ८९ वाहनांची नोंद झाली असून त्यात स्कोडा आणि फॉक्सवॅगन आणि टोयाटो गाडय़ांची नोंद अधिक आहे. 
याच कालावधीत ताडदेव आर.टी.ओ.त सर्वाधिक २०१० वाहनांची नोंदणी झाली आहे. 
अंधेरी आर.टी.ओ.मध्येही एक हजार ४६३,बोरिवली आर.टी.ओ.त  १,३२४ महागडय़ा वाहनांची नोंद आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या