*बेरोजगारांसाठी माहितीचा जागर…ऑनलाईन सत्राचे आयोजन*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 26/10/2021 9:39 PM



बेरोजगारांनी सहभाग घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 26 ऑक्टोंबर: कोरोनामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला परिणामी अनेक हातांचा रोजगार गेला. बेरोजगारांना  रोजगार उपलब्धीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्राद्वारे 27 ऑक्टोंबर रोजी  दुपारी 3 वाजता योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये सहभागासाठी बेरोजगारांनी पूढाकार घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

रोजगारांच्या बऱ्याच संधी आता नव्याने उपलब्ध होत आहेत. कोरोनाचा प्रभाव लक्षणीयतेने कमी होत  आहे. यासाठीच बँक ऑॅफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या योजनांची माहिती या विषयावर गुगल मिटद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये बँक ऑॅफ इंडिया, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे, संचालक मिलींद इंगळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्याकरीता https:meet.google.com/gwf-hgwe-kkq या लिंकचा अथवा chandrapur.rojgar या फेसबुक प्रोफाईलला भेट देऊन दिलेल्या लिंकचा वापर करावा. तरी, जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा.

Share

Other News

ताज्या बातम्या