शालेय जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये अकुज इंग्लिश मीडियम स्कूल कुपवाड मधील ओम माने या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धे साठी निवड झाली. प्रज्वल ब्याकोड, निरंजन शेडबळकर, प्राची पार्टे यांनी व्दितीय क्रमांक तर किरण कुशवाह यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच अकुज् प्रायमरी स्कूल, कुपवाड स्कूलचा विद्यार्थी हेमंत सुतार याने सिल्वर मेडल मिळवून यश संपादन केले आहे.
शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये अकुज इंग्लिश मीडियम स्कूल कुपवाड मधील विद्यार्थिनी कु. सानिका बुधनूर द्वितीय क्रमांक व प्रांजली वाघमारे हिने चतुर्थ क्रमांक पटकावला या दोन्ही विद्यार्थीनींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक प्रशांत आढळी , विशाल काळेल यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ, अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, मुख्याध्यापिका व संस्थेच्या संचालिका कांचन उपाध्ये, उपमुख्याध्यापिका रोझिना फर्नांडिस, अकुज प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील, समन्वयक शंशाक आजेटराव याचे प्रोत्साहन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.