आर टी ओ प्रकरणाची चौकशी करून कारवाई करा तर वारणा उदभव योजनेची नेमकी वसुस्थीति आयुक्तांनी नागरिकांसमोर मांडावे : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/12/2023 6:58 PM

प्रति
मा.नाम.सुरेश भाऊ खाडे
    कामगार मंत्री तथा   पालकमंत्री सांगली जिल्हा 

विषय :- सांगली जिल्हा आर टी ओ ऑफिस मधील कामा बाबत
व 6 डिसेंबर 2023 रोजी घडलेल्या प्रसंग बाबत

महोदय

आपल्या सांगली जिल्ह्यातील आर टी ओ ऑफिस मध्ये एजंट आणि आरटीओ ऑफिस मधील अधिकारी कर्मचारी सर्वसामान्य माणसाला काम घेऊन आल्यावर मेटाकुटीला आणत आहेत
सर्व कारभार शासनाने ऑनलाईन केला असला तरी काहीतरी काम त्रुटी काढायच्या व नागरिकांना त्रास देऊन पैसे काढायचे असे अनेक प्रकार घडत आहेत
तसेच त्याचा कडेलोट झाला 6 डिसेंबर 2023 रोजी संबंधित आरटीओ अधिकारी श्री साळे व त्यांच्या मर्जीतील आरटीओ ऑफिस मधील काही एजंट एकत्रित बसून ऑफिसमध्ये कारभार करत असताना चित्रीकरणात कैद  झालेली आहे
सदर व्हिडिओ मध्ये एक सामान्य नागरिक व्हिडिओ काढत असताना संबंधित शाळेनामक अधिकारी अत्यंत आरेरावीची भाषा करताना दिसत आहे आम्ही माहिती घेतली असता सांगली जिल्हा आरटीओ ची पोस्ट रिक्त असल्याने अतिरिक्त भार श्री साळी यांना देण्यात आलेला आहे
ते साधारण पाच ते सहा वर्षांपासून सांगली आरटीओ मध्ये कार्यरत आहेत नियमाप्रमाणे त्यांची बदली होणे अनिवार्य होते मात्र ती झालेली नाही तरी सदर व्हिडिओ मुळे सांगली जिल्हा आरटीओ ची अब्रू महाराष्ट्राच्या वेशी वर टागलेले आहे
तरी संबंधित विषयाची संपूर्ण चौकशी करून श्री साळे यांचे निलंबन करण्यात यावे अथवा त्यांची बदली करण्यात यावी अन्यथा आम्हाला आंदोलन करण्याचे शिवाय पर्याय नाही
आपण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आपण पालकत्व स्वीकारून सदर प्रकरणाची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी विनंती आहे.

सतीश साखळकर,गजानन साळुंखे,प्रदीप कांबळे,अंकुश केरीपाळे 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या