महावितरणचे अधिकारी सुद्धा मॅनेज? : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/07/2025 3:50 PM

जत तालुक्यामध्ये महावितरणचे कर्मचारी बेकायदेशीर पणाने स्मार्ट मीटर बसवत असताना स्थानिक नागरिकांनी आमच्याकडे फोटो पाठवले आहेत.
स्मार्ट मीटर चे काम आदानी ग्रुपचे असताना सुद्धा महावितरणचे कर्मचारी कसे मीटर बदलत आहेत ही नेमकी काय भानगड आहे याची चौकशी महावितरणचे अधिकारी करणार का..,?
महावितरणचे अधिकारी सुद्धा आदानीला मॅनेज आहेत..?
आपल्या सांगली जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील एक सुद्धा लोकप्रतिनिधी मग ते कोणत्याही पक्षाचे आमदार असतील खासदार असतील याबाबत तोंड उघडायला तयार नाही हा खरा पडलेला प्रश्न आहे 
याबाबत सर्व लोकप्रतिनिधी यांनी तोंड उघडले पाहिजे अन्यथा सर्वसामान्य नागरिकांचा जो अधिकार आहे तो येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत वापरल्याशिवाय राहणार नाहीत.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या