आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
मुंबई दि: यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट मुंबई
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी गावस्तरीय नेतृत्वाची, सरपंचांची भूमिका अत्यंत महत्वाची असते.उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांचा सन्मान करण्यासाठी लोकमत समूहाच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे 'लोकमत सरपंच अवॉर्ड' सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यास उपस्थित राहून सर्व पुरस्कार्थी सरपंचांचा सन्मान केला व सोहळ्यास उपस्थितांना संबोधित केले.
देशाचा खरा विकास गावांच्या विकासात दडलेला आहे आणि गांवाचा विकास शक्य करण्यासाठी सरपंचाची भूमिका फार महत्वाची आहे.देशातील प्रत्येक गांव देशाच्या विकासकार्याच्या मुख्यधारेशी जोडले गेले पाहिजे, प्रत्येक गांव समृद्ध बनवायाचे आहे असा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी ,महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजप महायुती शासनाचा निर्धार आहे.
लोकमत सरपंच पुरस्कार कार्यक्रम हा उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना उत्तेजन देणारी औषधी सारखा आहे.लोकमत समूहाला या कार्यक्रमासाठी मी धन्यवाद देतो.
या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी माझ्यासोबत मंचावर कृषिमंत्री मा.माणिकराव कोकाटे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, ग्रामविकास आणि पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम, कार्यक्रमाचे संयोजक तसेच लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, लोकमत मुंबई संपादक अतुल कुलकर्णी, पुरस्कार विजेते सरपंच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.