पोलीस उपनिरीक्षक व हवलदार लाचलुचपतच्या जाळ्यात;
आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात; सामुहीक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करणेकरीता मागितले होते २० हजार रुपये…
सातारा दि: सामुहीक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी करत १५ हजार लाच स्वीकारताना पोलिस हवालदार उमेश गहीण व उपनिरीक्षक बिपिन बाळकृष्ण चव्हाण या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तक्रारदार यांनी वाई पोलीस ठाणे येथे त्यांचेविरूद्ध महिलेच्या तक्रारीवरून सामुहीक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करणेकरीता होत असलेल्या लाच मागणी बाबत दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी वाई पोलीस ठाणेचे आवारात केलेल्या पडताळणी कारवाई मध्ये पोलिस हवालदार उमेश गहीण याने वाई पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण यांच्यासाठी तक्रारदार यांचेकडे गुन्हा दाखल न करणेकरीता पंचासमक्ष रूपये २०,०००/- लाच मागणी करून तडजोडी अंती १५०००/- रूपये लाच रक्कम स्विकाण्याचे मान्य करून ती लाच रक्कम प्रशासकीय इमारती मधील पोलीस ठाणेचे बीट अंमलदार कक्षात स्विकारली, तसेच बिपिन चव्हाण यांनी उमेश गहीण याचे समवेत तक्रारदार याचेशी पंचासमक्ष झालेल्या पडताळणीमध्ये तक्रारदारास शिवीगाळ दमदाटी करून हाताने चापटी मारून अटक करण्याची भिती दाखवून लाच मागणीस प्रोत्साहन दिले. तक्रारदार यांनी लाच मागणीस होकार दर्शवताच त्यास सांगेल तेव्हा साक्षीदार व्हायचं असे बोलून उमेश गहीण याचे लाच मागणीस प्रोत्साहन दिले. या तक्रारीची शहानिशा करत पोलीस उपनिरीक्षक बिपिन बाळकृष्ण चव्हाण व उमेश दत्तात्रय गहीण या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सापळा कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे,अपर अधिक्षक विनय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे, पोलीस हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे यांनी काम पाहिले
*सामूहिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करू असे ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळल्या प्रकरणातील वाईचा फौजदार पसार झाला आहे तर पोलीस हवालदाराला तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे*