आज सांगली येथे मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य अशी पैगंबर जयंतीनिमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. सामाजिक एकतेचा संदेश देणारी मिरवणुकीसाठी मराठा क्रांती मोर्चा संभाजी ब्रिगेड तसेच मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आलं व या मिरवणुकीत सामील झालेल्या लहान बालकांना वाटप करण्यात आले त्याचबरोबर या स्वागत समारंभाच्या वेळेला बोलताना मराठा समाजाचे प्रमुख नी वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या मुस्लिम समाजाने गणेशोत्सवाचे भान ठेवून अकराव्या दिवशी आलेली पैगंबर जयंती पुढे ढकलून सामंजस्याचा एक पायंडा पाडला तसेच मराठा आंदोलन या वेळेला मुंबईत सरकारकडून आणि काही लोकांच्याकडून खाण्यापिण्याची रस्ते बंद करण्यात आले होते त्यावेळेला सांगलीच्या मुस्लिम समाजाने सांगलीतून 20000 भाकरी सुकी भाजी तसेच 500 किलो भडंग हा सांगलीतून या आंदोलनाकडे रवाना केला होता हा सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी आज मराठा समाजाच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये फुलांचा वर्षाव करून मुस्लिम समाजाच्या मिरवणुकीचे स्वागत केले याप्रसंगी शंभूराज काटकर डॉक्टर संजय पाटील सतीश साखळकर नितीन चव्हाण उमेश देशमुख राहुल पाटील विराज बुटाले सागर खंडागळे ओम भोसले रोहित भोसले राजेश कदम सचिन शिवजी असून पेंढारी ओम भोसले चेतन चव्हाण महेश साळुंखे शिवाजी जाधव अमोल चव्हाण रवींद्र केसरे रोहित पाटील रायदीप काटकर अनिकेत कराळे शिवप्रताप काटकर शुभम माने जहागीर शेख आदी उपस्थित होते.