मनपा महिला बचतगटांना इलेक्ट्रीक घंटागाडीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/09/2025 1:44 PM

सांगली, दि ११,
महापालिका महिला बचतगटाना इलेक्ट्रिक घंटागाडीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि खासदार विशाल पाटील, आमदार ईद्रीस नायकवडी आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

यामध्ये १८ महिला बचतगट मधील महिलांना या योजने मुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. मनपाने यामध्ये पुढाकार घेऊन चांगला उपक्रम राबविलेल्या आहे अशी प्रतिक्रिय पालकमंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. 

माधवनगर रोड येथील  जल शुद्धीकरण केंद्र,सांगली येथें    मनपा महिला बचतगट  यांना ९ इलेक्ट्रिक घंटागाडी लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मा खासदार विशाल दादा पाटील, आमदार इद्रिस नायकवडी आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाल जनजीविका योजना अंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला महिला बचत गटाकरिता ९ वाहने  प्राप्त झाली आहेत .
या योजने अंतर्गत १८ महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे, यामध्ये १ वाहन चालक तर १ साह्ययक असे एकूण १८ महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या सर्वाना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मनपावतीने देण्यात आले आहे. सर्व महिलांना वाहन परवाने प्राप्त झाल्याने सर्व वाहन चालक प्रशिक्षित झाले असून मनपाच्या सेवेत कार्यरत होत आहेत, या गाड्या मार्फत शहरातील व्यावसायिक क्षेत्रातील कचरा संकलन याद्वारे करण्यात येणार आहे. 
या कामी उप आयुक्त स्मृती पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. 
महाराष्ट्रातील एकूण पाच महानगरपालिकांना सदरच्या गाड्या प्राप्त झाल्या असून यापैकी आपल्या महापालिकेला 9 गाड्या प्राप्त झाल्या आहेत
या लोकार्पण वेळी वेळी अतिआयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त स्मृती पाटील, प्रकल्प प्रमुख ज्योती सरवदे , श्रीमती वंदना सवाखडे, संपदा मोरे, शाहीन शेख, सांगली शहर वस्तीस्तरीय संघाच्या अध्यक्षा पुष्पा सोनवणे, कुपवाड वस्तीस्तरीय संघाच्या अध्यक्षा कविता पवार, मिरज वस्तीस्तरीय संघाच्या अध्यक्षा राजश्री कोरे, सामाजिक कार्यकर्त्यां रेखा पाटील, नितीन डोंबाळे, अल्फीया पठाण, महेश पाटील यासह महिला बचतगटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

Share

Other News

ताज्या बातम्या