लाड- पागे समितीच्या शिफारशींची संपूर्ण अमंलबजावणी मनपा मध्ये होते आहे ,त्या बदल मनपाचे अभिनंदन, मा ना उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करून मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांना लाभ देऊन न्याय द्यावा :श्री गोरक्ष लोखंडे सदस्य,(सचिव दर्जा) महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुबंई
आज दि १०/९/२०२५रोजी सांगली येथे मा. श्री ,गोरक्ष लोखंडे सदस्य, (सचिव दर्जा)महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी मनपाचा आढावा घेतला आहे,
मा सत्यम गांधी आयुक्त यांनी श्री गोरक्ष लोखंडे सदस्य, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांचे स्वागत केले ,माअति.आयुक्त निलेश देशमुख यांनी प्रास्ताविक करून मनपा क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या योजना बाबत सविस्तरपणे माहिती दिली ,मागासवर्गीय कर्मचारी यांना देत असलेल्या सवलती ,लाभ इत्यादी बाबत माहिती दिली आहे,
श्री लोखंडे सदस्य, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी या वेळी लाड पागे समितीच्या शिफारशी अनुषंगाने अंमलबजावणी काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.
मा ना उच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन कोर्टाच्या आदेशाच्या अवमान होणार नाही याची दखल घ्यावी असे नमूद केले,
श्री लोखंडे सदस्य, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी भारतीय संविधान बाबत चित्र फित दाखवून संविधान बाबत थोडक्यात माहिती दिली, सदरची चित्रफीत ही 12 मिनिटांची असून या चित्रफीत मध्ये भारतीय संविधान किती महत्वाचे आहे नागरिकाच्या हक्क ,अधिकार ,कर्तव्य , त्या बाबत या चित्रफीत मध्ये चांगल्या प्रकारे नमूद केले आहे, भारतीय संविधान मध्ये कोणतेही बदल मूळ ढयाचा मध्ये बदल करून करता येणार नाही ,या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या केस मधील निकाल देखील नमूद केले आहे, विविधेतून एकता असलेले भारतीय गणतंत्र आहे हे देखील नमूद केले आहे,
मा राहुल रोकडे अति.आयुक्त यांनी आभार मानून बैठक संपन्न झाली आहे.
या वेळी राहुल रोकडे अति.आयुक्त उप आयुक्त स्मृती पाटील ,अश्विनी पाटील निखिल जाधव ,शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण ,मुख्य लेखाधिकारी विद्या काकडे, अधिकारी कर्मचारी या वेळी उपस्थितीत होते.