तर " त्या" पूलावर घटस्थापना करणार, सर्वपक्षीय कृती समितीचा इशारा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/09/2025 12:40 PM

वसगडे येथील रेल्वे उड्डाणपूल उद्घाटनासाठी मुख्यमंत्री केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांना वेळ नाही म्हणून सदर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे असे काल जबाबदार अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे 
मुख्यमंत्री असतील केंद्रीय वाहतूक मंत्री असतील हे जनतेच्या सोयी सुविधा साठी व कामासाठी आहेत काय यांच्यासाठी जनता आहे हा खरा प्रश्न आता सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदारांना पडला आहे.
तसेच पुलावर डांबरी रस्त्याचे काम राहिले आहे ते काम तेथील एक व्यापारी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काम करून देत नाही असे काही लोकांच्याकडून समजले.
जे व्यापारी या कामासाठी विरोध करतात त्यांचे जिल्ह्यातील सगळ्या प्रशासकीय अधिकारी मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पालकमंत्री यांच्याशी घनिष्ठ  संबंध आहे त्यामुळे सुद्धा व त्यांच्या वैयक्तिक भूमीसंपादनातील भानगडी मुळे सदर रस्त्याचे काम थांबले आहे.
पालकमंत्री चॉकलेट वाटप फिरतात मग या कामाबाबत त्यांना कुठलं चॉकलेट पाहिजे आहे हा पण खरा प्रश्न आहे.
त्या भागातील लोकप्रतिनिधी माजी मंत्री विश्वजीतजी कदम असतील पलूस कडेगाव मधील कामांसाठी पाठपुरावा करणारे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख असतील माजी जिल्हा परिषदेचे संग्राम भाऊ देशमुख असतील खासदार विशाल दादा पाटील असतील त्याच रस्त्याने येजा करतात त्यांना हा विषय लक्षात येत नसेल का? आपण खरा प्रश्न पलूस कडेगाव मधील नागरिकांना पडला आहे .
जिल्हाधिकारी नेमका या रस्त्याने जातात का नाही हा सुद्धा प्रश्न पडला आहे.
आम्ही 20 ऑगस्टला आंदोलन करून पूल सुरू करणार असे जाहीर केल्यानंतर एक दिवस चालू झाला परत वेगवेगळी कारणे देऊन सदर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
घटस्थापने पर्यंत सदर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही तर स्थानिक नागरिकांना व वाहतूकदारांना बरोबर घेऊन सदर पुलावर घटस्थापना करण्यात येणार आहे याची नोंद मुख्यमंत्री असतील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील स्थानिक प्रशासन असेल यांनी घ्यावी.

सतीश साखळकर उमेश देशमुख महेश खराडे शंभूराज काटकर गजानन साळुंखे आनंद देसाई 

सर्वपक्षीय कृती समिती सांगली जिल्हा 

Share

Other News

ताज्या बातम्या