*** पुढील टप्प्यात गाय ,घोडे अन्य भटक्या जनावरांसाठी खुले कोडवाडे उभारणी होणार
२ कोटींच्या खर्चातून प्राणी कल्याणासाठी महापालिकेचा पुढाकार
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने शहरातील निराधार आणि भटक्या श्वानांसाठी अत्याधुनिक डॉग शेल्टर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे २ कोटी रुपयांच्या खर्चातून हे शेल्टर उभारले जाणार असून, ते Animal Birth Control (ABC) आणि Animal Welfare Board of India (AWBI) च्या मानकांनुसार बांधले जाईल. या शेल्टरमुळे श्वानांचे कल्याण, सुरक्षितता आणि शहराच्या स्वच्छतेला मोठा हातभार लागणार आहे.
"शहरातील कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या कल्याणासाठी आम्ही हे शेल्टर उभारत आहोत. येथे केवळ आश्रयच नव्हे, तर श्वानांची नसबंदी, लसीकरण आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध होईल,"पुढील टप्पात मुक्त कोंडवड्या मध्ये गाय ,घोडे अन्य भटकी जनावरे यांच्या साठी २२०००चों फूट मध्ये निवारा केंद्र करणार आहे,
— आयुक्त श्री. सत्यम गांधी
उपायुक्त श्री. निखिल जाधव यांनी सांगितले की,
"हे शेल्टर सांगलीला प्राणीमैत्रीपूर्ण शहर म्हणून ओळख मिळवून देईल. स्थानिक पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांसह आम्ही हे काम जलद गतीने पूर्ण करू. नागरिकांचा सहभाग यशस्वीतेसाठी महत्त्वाचा ठरेल."
महापालिकेच्या या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात भटक्या जनावरांसाठी स्वतंत्र कोंडवाडा, सुरक्षेसाठी कंपाउंड भिंत व प्राण्यांसाठी मुक्त संचार क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे.
ठळक वैशिष्ट्ये
१) एकूण २८,४०६ चौ. फुट जागेमध्ये दोन टप्यात प्रकल्प
२) पहिल्या टप्यात ६,५५२ चौ. फुट क्षेत्रामध्ये डॉग शेल्टर युनिट
३)१५० श्वानांना ठेवण्याची क्षमता
४) दैनंदिन कामकाजासाठी कार्यालय
५) जखमी श्वानांवर उपचारासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी
६) स्वतंत्र वॉशिंग युनिट
७) आजारी व रेबीज श्वानांसाठी विलगीकरण कक्ष
८)श्वानांच्या खाद्यसाठवणुकीसाठी स्टोअर रूम
९) कर्मचारी स्वच्छतागृह सुविधा
१०) श्वान दत्तक प्रक्रिया व नोंदणी कार्यालय
११) श्वानांसाठी केअर युनिट
सांगलीवाडी येथिल जकात नाका या ठिकाणी सदरचे निवारा केंद्र होणार आहे,