पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचे लातूर व नांदेड मधील जुगार अड्डयांवर छापे अग्नीशस्त्रासह साडेतीन लाख रुपयांची रोकड, 27 मोबाईलसह जुगार साहित्य जप्त

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 31/01/2026 7:34 PM

नांदेड :- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर व नांदेड शहरातील इतवारा भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे पथक पाठविले होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री श्रीराम माचेवाड व (5) अंमलदारांचा समावेश असलेल्या सदर पथकाने, दिनांक 27.01.2026 रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईक चौकातील रमेश गिरी याच्या जुगार अड्डड्यावर कारवाई करत, नगदी रुपये 1,05,200/- व 70 हजार रुपयांचे (12) मोबाईल असा एकूण 1,75,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून नमूद प्रकरणात (13) आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुरनं क्र. 41/2026 कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर दि. 30.01.2026 रोजी सदर पथकाने, नांदेड शहरातील पो.स्टे. इतवारा हद्दीत असणाऱ्या मच्छी मार्केटमधील जुगार अड्डड्यावर कारवाई करत, जुगार खेळणाऱ्या 25 व्यक्तींकडून नगदी 2,34,100/- रुपये व 4,28,000/- रुपयांचे 27 मोबाईल असा एकूण 6,62,100/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे इतवारा येथे गुरनं क्र. 32/2026 कलम कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यादरम्यान, पथकाने पो.स्टे. इतवारा हद्दीत, आरोपी नामे जयकिशन ऊर्फ जय राजेशसिंह ठाकूर, वय 21 वर्ष, रा. उल्हासनगर, तरोडा नाका, यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व 03 जिवंत काडतूस असा एकूण 31,500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्याचेविरुध्द पो.स्टे. इतवारा येथे गुरनं 31/2026 कलम 3/25 शस्त्र अधिनियम, 1959 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

वरील दोन्हीही ठिकाणांच्या छाप्यात पथकाने एकूण 3 लाख 40 हजार रुपये रोकड व 5 लक्ष रुपयांच्या (39) मोबाईल सह जुगाराचे साहित्य व 1 गावठी अग्नीशस्त्र व 3 जिवंत काडतूस किंमती 31,500/- असा एकूण 8 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाईत सपोनि श्री श्रीराम माचेवाड यांचेसह पोहेकॉ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकों / गणेश धुमाळ, पोकों/ कामाजी गवळी पोकों / विलास सुरवसे यांनी सहभाग घेतला.

सदर कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांना 10,000 रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. सदर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आरोपींना आणखी कोणाचे पाठबळ होते का? याचा शोध घेण्यात येत आहे.

आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर किंवा 91 50 100 100 या 'खबर' हेल्पलाइनवर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या