आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
*7 फेब्रुवारी रोजी मतदान तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी *
सातारा दि. : राज्य निवडणूक आयोगान े जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
या सुधारीत कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याचा दि. 31 जानेवारी आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्या पासून होणार आहे. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याचा दि. 11 फेब्रुवारीपर्यंत असा निवडणुकीचा सुधारीत कार्यक्रम असणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.