विकास पुरुष काळाच्या पडद्याआड"* दादांची अकाली एक्झिट महाराष्ट्रावर शोककळा

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 28/01/2026 10:35 PM

विकास पुरुष काळाच्या पडद्याआड"* दादांची अकाली एक्झिट महाराष्ट्रावर शोककळा 
जो पर्यंत माझे हातपाय चालू आहे तो पर्यंत मी तुमचं भलच करील मी तुमच्या कामाचा माणुस आहे कामाचाच माणुस  असं म्हणणारा नेता व राज्याचे 
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आज काळाच्या पडद्याआड गेला मुंबई ते बारामती येथे प्रचारासाठी खाजगी विमानाने जात असताना त्यांच्या विमानाला अपघात होऊन ६ जण जखमी होऊन मृत्यू ची बातमी आल्यानंतर काही मिनिटांनी अजित दादा यांच्या मृत्यूची बातमी आली. पण मन मानायला तयार नव्हते.  सर्वांना प्रिय असणारी अजित दादा फक्त जखमी आहेत.असे सुरूवातीला वाटले होते परंतु काही वेळाने लगेचच बातमी आली कि दादा गेले त्यांचा असा एकाएकी मृत्यू होऊ शकत नाही. ते जिवंत असतील ही भोळी आशा. 
ते कोणत्या पक्षाचे असो,  वैचारिक मतभेद असले तरी या राज्याचे कुटुंब उपप्रमुख अजित दादा सुखरुप असावेत ही भाबडी आशा. असे कोणतेही मराठी मन नसेल जे अजित दादांच्या आकस्मिक जाण्याने हेलावले नसेल. असे कोणतेही डोळे नसतील जे आज पाणावले नसतील. 
शरद पवार साहेबांच्या नावाच्या राजकारणातील वटवृक्षाच्या छायेखाली राहूनही स्वतःचे मोठे राजकीय अस्तित्व निर्माण करणे सोपी  गोष्ट नव्हे. ती किमया अजित दादांनी करून दाखवली. 
राष्ट्रवादी काँग्रेस / काँग्रेस आघाडी सत्तेत असताना सर्व युवकांच्या दिल की धडकन एकच होती अजित दादा! दादांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे पदे भुषवून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती अगदी परखड व  सडेतोड बोलणारा नेता म्हणजे अजित दादा .  
 वैयक्तिक किंवा घरगुती कामासाठी जाताना दादांचा अपघात झाला नाही. राज्याचे, पक्षाचे कामासाठी जाताना अपघात झाला. एका राजकारण्याचे आयुष्य लोकांना समर्पित असते. त्यामुळे लोकांनी आणि नेत्यांनी एकमेकावर प्रचंड प्रेम करावे.दादांचे सर्वसामान्य जनतेशी घट्ट नाते होते तळागाळातील लोकांशी कायमची जुळलेली नाळ असे लोकनेते होते 
दादा, थोड्या शब्दात सामावेल एवढेच तुमचे कार्यकर्तृत्व नाही. अवघ्या महाराष्ट्राचे मन हेलावले, सुन्न झाले आहे. आपल्या कुटुंबातील एक सदस्य गेल्याच्या भावनेने पाणावलेले डोळे हीच तुमची कमाई. 
घड्याळ आहे पण थांबले आहे.
जेव्हा जेव्हा या देशाचा, राज्याचा इतिहास लिहिला जाईल दादा आपले नाव सुवर्णअक्षरांनी लिहिले जाईल.
" एकच वादा अजित दादा" 
पण दादा  वादा तोडून चाललात  बरं!
अखेरचा जय भीम जय महाराष्ट्र दादा !"निशब्द  भावपूर्ण श्रद्धांजली दादा..🙏🏽

Share

Other News

ताज्या बातम्या