नांदेड येथे तेली समाज सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/02/2026 8:29 PM

नांदेड : तेली समाज सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा–२०२६ रविवारी दि. 1 फेब्रुवारी २०२६ रोजी वामनराव पावडे मंगलकार्यालय, पूर्णा रोड, नांदेड येथे मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध नियोजनात आणि समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दशरथराव गोविंदराव सावकार सूर्यवंशी (समाजरत्न, तेली समाज नांदेड) हे होते. कार्यक्रमास मा. श्री राजकुमार माने साहेब (उपजिल्हाधिकारी, नांदेड), मा. श्री राजेंद्र टाकणे साहेब (डी.वाय.एस.पी., आय.जी. ऑफिस, नांदेड) तसेच मा. श्री अनिल गव्हाणकर साहेब (डी.वाय. एस. पी . सी . आय. डी.नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. बालाजी बनसोडे व सचिव श्री लक्ष्मण श्रीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेऊन मेळावा यशस्वी केला.
या मेळाव्यास महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने पालक तसेच वधू-वरांनी सहभाग नोंदवला. समाजात सुसंस्कृत, पारदर्शक व विश्वासार्ह विवाह जुळवणीची प्रक्रिया घडावी, तसेच अनावश्यक खर्च व आडंबर टाळून संस्कारक्षम विवाह संकल्पना रुजावी, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावर्षी संस्थेच्या वतीने “तेली समाज भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला. समाजासाठी दीर्घकाळ केलेल्या उल्लेखनीय सेवाभावी कार्याबद्दल आदरणीय श्री राम गोविंदराव सावकार सूर्यवंशी यांना तेली समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने तेली समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे. तसेच श्री गणेशराव रामचंद्र सूर्यवंशी (विश्वस्त व सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी) यांनाही त्यांच्या प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तेली समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. या घोषणेचे उपस्थित समाजबांधवांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट, शिस्तबद्ध व वेळेचे काटेकोर पालन करणारे होते. त्यामुळे उपस्थित पालक व वधू-वरांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तेली समाज सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, महिला प्रतिनिधी, युवक कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या