प्रशासन वेळेवर सावध न झाल्यास रस्त्यांवर उतरणार, भयमुक्त व नशामुक्त अभियान सांगली जिल्हा यांचा इशारा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/02/2026 5:01 PM

सांगली व मनपा परिसरात वारंवार होणाऱ्या नशेबाजांच्या कृत्याने लोक भयभयीत झाले आहेत, घराबाहेर पडल्यानंतर आपण घरी परत सहीसलामत घरी परत येऊ का नाही याची शाश्वती राहिली नाही. प्रशासनाची उदासीनता, नावालाच असणारे टास्क फोर्स, पोकळ घोषणा व पोलिसांचा वचक या बाबीत प्रामुख्याने उणीवा जाणवत आहेत, अशा भावना जनमाणसातून व्यक्त होत आहेत.

    झोपी गेलेले प्रशासन, पोलिस प्रशासन जागे झाले नाहीतर लोकांनाच रस्त्यावर उतरण्याची परिस्थिती येऊ शकते. अश्या परिस्थीतीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहीला असा इशारा भयमुक्त व नशामुक्त अभियान सांगली जिल्हा यांनी दिला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या