नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितासाठी आणि बँक व्यवहारांना अधिक सुलभ करण्यासाठी मनपा आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यामध्ये "Employee Salary Account Linkage Scheme" अंतर्गत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या करारावर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दिमाखदार सोहळ्यात दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि युनियन बैंक ऑफ इंडिया यांच्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 'Employee Salary Account Linkage Scheme' अंतर्गत एैतिहासिक सामंजस्य करार (MoU) सोहळा शनिवार दि.१६ मे २०२६ रोजी नियोजन भवन येथे पार पडला. या कार्यक्रमास *महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण* यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे *महापौर सौ.कविता संतोष मुळे, पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले,भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर* युनियन बँक ऑफ इंडीयाचे जनरल मॅनेजर लोकनाथ साहु, डिप्टी झोनल हेड निरंजन बारीक, असिस्टंट जनरल मॅनेजर सावन शिव, रिजनला मॅनेजर प्रमोद पऱ्हाते, महिला व बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, उपसभापती निरंजना लांडगे, सभागृह नेता महेश कनकदंडे, गटनेता स.मुजीब स.मुख्तार, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, उपायुक्त अभिजीत वायकोस, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, नितीन गाढवे, विविध प्रभागाचे नगरसेवक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्तावित *पालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे* यांनी केले. त्यांनी या सांमजस्य कराराची पार्श्वभुमी व कर्मचाऱ्यांना होणारे लाभ यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तदनंतर युनियन बँकेच्या वतीने *असिस्टंट जनरल मॅनेजर सावन शिव व बँकेच्या प्रबंधक पौर्णिमा मुंडे* यांनी या करारामुळे पालिका कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोईसुविधे संदर्भात सादरीकरण केले.
या करारानुसार महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना युनियन बँकेमार्फत विशेष वेतन खात्याच्या अत्याधुनिक आणि डिजिटल बँकिंग सुविधा पुरवल्या जातील. महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि वित्तीय सुरक्षेसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. या करारानुसार मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांना खात्यात किमान रक्कम ठेवण्याची कोणतीही सक्ती नसेल. तसेच या वेतन खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांना अपघाती मृत्यू आणि कायमचे अपंगत्व आल्यास तब्बल एक कोटी रुपयांचे मोफत वैयक्तिक अपघात विमा संरक्षण दिले जाईल. आपत्कालीन प्रसंगी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या मर्यादेत तात्पुरती ओव्हरड्राफ्ट म्हणजेच आगाऊ रक्कम उचलण्याची विशेष सवलत मिळेल. त्याचप्रमाणे गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना प्रक्रिया शुल्कात व व्याज दरात विशेष सूट दिली जाईल. त्याबरोबर अमर्यादित एटीएम ट्रान्झॅक्शन, मोफत प्लॅटिनम/रुपे डेबिट कार्ड, मोफत चेकबुक आणि इंटरनेट बँकिंग व एसएमएस सुविधा मोफत पुरवल्या जातील. विशेष बाब म्हणजे अगदी नाममात्र विमा शुल्कावर कर्मचाऱ्यांना ३३ लाखांचा आरोग्य विमा मिळणार आहे. या वेतन खात्यामध्ये कर्मचाऱ्यांना तिन्ही प्रकारच्या अर्थात जिवन विमा, मुदत विमा व आरोग्य विम्याचे कवच प्राप्त होणार आहे.
या सोहळ्याप्रसंगी बोलताना पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले की, कर्मचाऱ्यांना तातडीने वित्तीय सेवा मिळाव्यात आणि त्यांच्या भविष्याला सुरक्षा लाभावी या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. युनियन बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने सुध्दा मनपा कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम आणि जलद बँकिंग सेवा देण्याची ग्वाही दिली आहे. तसेच याप्रसंगी महापौर सौ.कविता संतोष मुळे म्हणल्या की, “कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी भरमसाठ लाभासह कारार करणारी ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. महासभा कर्मचाऱ्यांच्या सदैव पाठीशी असुन यापुढे सुध्दा असे सकारात्मक कार्यक्रम राबविले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यास उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपली भुमिका मांडताना “या काराराचा निश्चितच पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सकारात्मक परिणाम होऊन त्यांच्या कामाची गुणवत्ता वाढविण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमुद केले. या करारासाठी बऱ्याच बँकेनी आपले प्रोपोजल पालिकेत सादर केले होते परंतु सर्वात उत्तम ही युनियन बँक ठरली असुन बँकेने सुध्दा कर्मचाऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरुन चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे डिजिटल बँकींग आज काळाजी गरज बनत चालली असल्याने ऑनालाईन फ्रॉड होणार नाहीत याची दक्षता घेण्याची सुचना यावेळी चव्हाणांनी केली. वेळोवेळी शासनाकडे निधीसाठी साकड न घालता पालिकेच्या उत्पन्नात भर पाडण्याच्या दृष्टीकोणातुन भविष्यात वाटचाल करावी लागेल असे प्रतिपादन यावेळी चव्हाणांनी केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.संतोष देवराय व बँक प्रबंधक पौर्णिमा मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन युनियन बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर सावन शिव यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, कार्यालय अधिक्षक सुजाता वाडीयार, वरिष्ठ लिपीक स.सतपालसिंग कोल्हापुरे, गजानन रासे, निलेश शातलवार, लेखा लिपीक यश गुंजकर, शारेख अन्वर, दत्तात्रय गोलपल्ले आदींनी विशेष परिश्रम घेतले.