सुपा येथे शिवतीर्थ चौक सुशोभीकरण, पाणंद रस्ते कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 17/05/2026 1:42 AM



अहिल्यानगर, दि. १६  पारनेर तालुक्यातील सुपा येथे पर्यटन विकास अंतर्गत शिवतीर्थ चौक सुशोभीकरण काम तसेच सुपा गावठाणांतर्गत तीन पाणंद रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी आमदार काशिनाथ दाते, उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील शहरांचा विकास हा राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमात असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामे गुणवत्तापूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत.

४० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांमुळे परिसराच्या विकासाला गती मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

#भूमिपूजन #BhumiPujan2026 #अहिल्यानगर #Ahilyanagar #महाराष्ट्रशासन #MahaGov #सुपा #SupaDevelopment #पालकमंत्री #GuardianMinister #शिवतीर्थचौक #ChaukBeautification #पाणंदरस्ते #FarmRoads #पर्यटनविकास #TourismGrowth #ग्रामीणविकास #RuralInfrastructure #गुणवत्तापूर्णकाम

Share

Other News

ताज्या बातम्या