नांदेड:- माननीय दत्तात्रय पांडुरंग अनंतवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय कलाल, गौड समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील अनंतवार यांच्या वतीने वसरणी येथील ज्योतिबा फुले सेवा ट्रस्ट संचलित निवासी अंध विद्यालयात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच फळांचे वाटप करण्यात आले.
वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवावर न करता गरजू विद्यार्थ्यांच्या उपयोगी यावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. गणवेश व फळे मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्याची परंपरा पुढे नेत वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमास राष्ट्रीय कलाल, गौड समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील अनंतवार, CITUच्या राज्य सचिव उज्वला पडलवार, कलाल समाज संघटनेचे नांदेड उपाध्यक्ष अशोक पडलवार, सचिव गंगाधर नंदेवाड, सुरेश अनंतवार, गजानन अनंतवार यांची उपस्थिती होती.
विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाराव इबितवार यांच्यासह शिक्षक भास्कर वसुदा निकम, सुरेश होळंबे, पंकज शिरभाते, रामराव जोजार, मनोज कलवले तसेच शिक्षकेतर कर्मचारी नामदेव इंगळे, नागनाथ कुचेवार आणि सुभाष केंद्रे उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. समाजातील गरजू घटकांसोबत आनंद वाटून घेण्याची आणि सामाजिक जबाबदारी जपण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिळाली.