नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील अवैध गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार विशेष मोहिमे सुरु आहे. त्याअनुषंगाने पोलीस ठाणे अर्धापूर येथील पोलीस पथकाने कारवाई करून एका चार चाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाला जप्त केला आहे.
दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी महादेव मांजरमकर, प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे अर्धापुर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथक अर्धापूर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मौजे पार्डी (म.) शिवारातील उड्डाण पुलाजवळ टोलनाक्याच्या अलीकडे एक संशयित मारुती सुजुकी अर्टिगा वाहन येत असल्याचे दिसुन आहे. पोलीस पथकाने पंचांना सोबत घेऊन सदर वाहनाची तपासणी केली. त्यावेळी अर्टिगा वाहन क्रमांक MH-14-EC-4677 हे आढळून आले. वाहनातील चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सय्यद मुक्तार सय्यद रसूल, वय 34 वर्षे, व्यवसाय चालक, रा. पूर्णा, कानडखेड, जि. परभणी असे सांगितले.
वाहनाची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी प्रतिबंधित केलेला 1) केसरयुक्त विमल पानमसाला (KING PACK) - एकूण 440 पाकिटे, 2) केसरयुक्त विमल पानमसाला (KING PACK - 6 पाऊच) - एकूण 440 पाकिटे, 3) केसरयुक्त विमल पानमसाला (BIG PACK) - एकूण 330 पाकिटे, 4) प्रिमियम V-1 जर्दा - एकूण 1100 पाकिटे, असा गुटखा पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची एकूण किंमत ₹3,17,240/- व 5) मारुती सुजुकी अर्टिगा वाहन क्रमांक MH-14-EC-4677 अंदाजे किंमत ₹5,00,000/- असा एकूण ₹8,17,240/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी वरील नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे अर्धापुर गु.र.नं. 478/2026 कलम 123 भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रतिबंधित पदार्थांचा साठा कोठून
आणण्यात आला, त्याचा पुरवठा कोणाकडून करण्यात आला तसेच त्याची पुढील विक्री कोणास करण्यात येणार होती, याबाबत पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशाने श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली मा. माणीक बेद्रे, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग नांदेड ग्रामिण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक/महादेव मांजरमकर, सपोनि/भास्कर कांबळे, पोउपनि/भोसले, व पोलीस अंमलदार गजानन शिंदे, गौतम कांबळे (नेमणुक अर्धापुर पोलीस ठाणे) यांनी पार पाडली आहे.
नांदेड जिल्हा पोलीसांकडून अवैध गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच इतर प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.