केंद्र-राज्य सरकारमध्ये "बदलाव जरुरी है" म्हणत वणी(यवतमाळ)येथुन CPI चा दुसरा जथ्था दिल्लीकडे रवाना

  • Mr.Irfan Shaikh (Wani Rajur)
  • Upadted: 31/08/2026 7:55 PM

*केंद्र-राज्य सरकारमध्ये "बदलाव जरुरी है" म्हणत वणी(यवतमाळ)येथुन CPI चा दुसरा जथ्था दिल्लीकडे रवाना*
*वणी(यवतमाळ)*-- : केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात तसेच महागाई, बेरोजगारी, कामगारांचे प्रश्न, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी यांना २६,०००/- किमान वेतन, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी यांना ९,०००/- व त्यावर महागाई भत्ता, शेतकऱ्यांचे प्रश्न, सार्वजनिक शिक्षण व आरोग्याच्या प्रश्नांवर आवाज बुलंद करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर ‘बदलाव जरूरी है’ महारॅली आयोजित करण्यात आली आहे. या महारॅलीत सहभागी होण्यासाठी वणीसह यवतमाळ जिल्ह्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व समर्थकांचे दोन जथ्थे आज सकाळी जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे,वणी तालुका सचिव कॉ.मोरेश्वर कुंटलवार,बाभुळगाव तालुका प्रभारी कॉ.दिपक माहुरे,नेर तालुका सचिव कॉ.दिलीप महाजन,किसान सभा अध्यक्ष कॉ.पंढरी मोहीतकर,सचिव कॉ.रवी गोरे यांचे नेत्रुत्वात शेकडो कार्यकर्ते विविध वाहणाने वणी,यवतमाळ येथुन दिल्लीकडे रवाना झाले.
'केंद्र-राज्य सरकारमध्ये बदलाव जरुरी है’, ‘महागाईला आळा घाला’, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी यांना २६,०००/- किमान वेतन द्या, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी यांना ९,०००/- व त्यावर महागाई भत्ता द्या. ‘तरुणांना रोजगार द्या’, ‘कामगारांचे हक्क सुरक्षित करा’, ‘शिक्षण व आरोग्याचे खासगीकरण थांबवा’ अशा विविध मागण्यांसाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय आवाहनानुसार देशभरातून कार्यकर्ते दिल्लीच्या रामलीला मैदानावर एकत्र येणार आहेत. रॅलीमध्ये रोजगार, सार्वजनिक शिक्षण-आरोग्य, शेतकऱ्यांना न्याय्य दर, कामगारांचे हक्क, सामाजिक न्याय, महिला आरक्षण तसेच लोकशाही व संविधानिक मूल्यांच्या संरक्षणाचे प्रश्न मांडले जाणार आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या