ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सांगलीत AIIMS हॉस्पीटल होण्यासाठी प्रयत्न करावे :- शिवसेना..


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 6/14/2021 4:07:42 PM

  
14 जून 2021 ,
     शिवसेना सांगली जिल्हा माजी पदाधिकारी यांच्या वतीने सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना निवेदन देण्यात आले. खासदार संजय काका पाटील हे बाहेरगावी असल्याने भेट होऊ शकली नाही. सदरच्या निवेदनातून अशी मागणी करण्यात आली की सांगली साठी एम्स AIIMS हॉस्पिटल मंजूर करण्यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करावे AIIMS एम्स या हॉस्पिटल बरोबरच सरकारी वैद्यकीय महाविद्यालय एम.बी.बी.एस  M.B.B.S तसेच त्याला संलग्न केंद्रीय नर्सिंग कॉलेज ANM- GNM कॉलेज असणार आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राचे हब असणारे सांगली मिरज शहरांचा वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे तसेच सदरच्या एम्स AIIMS हॉस्पिटल मुळे सांगली मिरज परिसराला वैद्यकीय क्षेत्रात 5000/- पाच हजार रोजगार उपलब्ध होणार आहे याची खास नोंद घ्यावी.
     संपूर्ण भारतभर एम्स AIIMS  हॉस्पिटलची शाखा केंद्र सरकारच्या वतीने देण्याचे चालू असल्याने सदरचे AIIMS  हॉस्पिटल व त्याला संलग्न M.B.B.S व नर्सिंग कॉलेज आपल्या महाराष्ट्रात फक्त नागपूर येथे केंद्र सरकारने दिले आहे तसेच सदरचे हॉस्पिटल कर्नाटक राज्यात नसून सांगली परिसर हा पश्चिम महाराष्ट्र,कोकण, मराठवाडा, व उत्तर कर्नाटक, या सर्व परिसराला मध्यवर्ती ठिकाण असल्याने याठिकाणी एम्स AIIMS हॉस्पिटलची शाखा व सलग्न एम्स M.B.BS मेडिकल व नर्सिंग कॉलेज सांगली येथे तात्काळ मंजूर करण्यासाठी आमदार गाडगीळ यांनी केंद्र सरकारकडे प्रयत्न करावे अशी निवेदनातून मागणी करण्यात आली. सदरचे हॉस्पिटल मल्टी सुपर स्पेशालिटी असल्याने सर्व उपचार मोफत व माफक दरात औषधोपचार मिळणार आहे सदरच्या हॉस्पिटल केंद्रीय रुग्णालय असणार आहे. तसेच सदरच्या हॉस्पिटल सरकारी असल्याने सदरच्या हॉस्पिटल च्या माध्यमातून सर्व रुग्णांना मोफत माफक दरात औषधोपचार केला जातो सदरचे एम्स AIIMS हॉस्पिटल केंद्र सरकारच्या वतीने उभा करण्यास सर्व साधारण 1200 ते 1500 कोटी खर्च अपेक्षित आहे तसेच सदरच्या हॉस्पिटल साठी 300 ते 400 एकर जागा लागणे अपेक्षित आहे हे सर्व केंद्र सरकार करणार असल्याने भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करावे अशी मागणी शिवसेना माजी पदाधिकारी सांगली जिल्हा यांनी केली तसेच स्थानिक मंत्री, आमदार, खासदार, व सर्व लोकप्रतिनिधी यांनी सदर हॉस्पिटल सांगली येथे येण्यासाठी सर्व राजकारण बाजूला ठेवून तमाम सांगलीकरांच्यासाठी व जनतेसाठी एकत्र येऊन सदरचे AIIMS हॉस्पिटल सलग्न मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज सांगली साठी मंजूर करण्यासाठी दिल्लीदरबारी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
    यावेळी रावसाहेब घेवारे,जितेंद्र शहा, अनिल शेटे, लक्ष्मण वडर, रविंद्र निकम, कांबळे सर, उपस्थित होते.

Share

Other News