ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

वहागांव येथे सेवा रोडवर कंटेनर पलटी रेल्वे साहित्य सेवा रोडवर विखुरले ; लाखों रूपयांचे नुकसान


  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 6/14/2021 7:08:49 PM


सातारा/ प्रतिनिधी
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागांव ता.कराड गावचे हद्दीत भरधाव वेगात जाणार्या कंटेनर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटुन अपघात झाला. यामध्ये रेल्वेचे साहित्य सेवा रोडवर विखरून सेवा रोड काही वेळ बंद झाला होता.सदरचा अपघात हा रविवार दि.14 रोजी दुपारी झाला.सुदैवाने जीवीतहानी झाली नाही.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरून मुंबई ते धारवाड (कर्नाटक) असा रेल्वेच्या साहित्याची वाहतूक करणारा मालट्रक कंटेनर क्रमांक केए.०१.एजे. ४१८० हा वहागांव गावचे हद्दीत आल्यानंतर कंटेनर चालक मुलराज रा,ज  कश्मिर (वय४५)यांचा कंटेनर वरील ताबा सुटल्याने कंटनेर महामार्गाच्या कडेला असणाऱ्या नाल्यात पलटी झाला यावेळी कंटेनर मधील साहित्य सेवा रोडवर विखुरले सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिक तसेच हेल्पलाइन विभागाचे दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, सदाशिव सकट, तानाजी नामदास यांनी मदत करून सेवा रोड वाहतूकीसाठी खुला केला.

Share

Other News