ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

नव संजीवनी देणारा, अनाथांचा नाथ :- नवनाथ बोडके


  • महादेव कळसे (Kelgao)
  • Upadted: 8/1/2021 5:19:40 PM

राजकुमार काळे

शरीर उत्तम चांगले।शरीर सुखाचे घोसुले।शरीरे साध्य होय केले।शरीरे साधले परब्रह्म।।
शरीर सकळही शुद्ध।शरीर निधींचाही निध।शरीरे तुटे भावबंध।वसे मध्यभागी देव शरीरा।।

जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगातील चरणांमधून सत्वगुणी मानवी शरीराचे वर्णन आणि त्याद्वारे भगवंत प्राप्तीचे उद्दीष्ट प्रतिपादित केलेले आहे.संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी पवित्र इंद्रायणीच्या तीरावर वसलेली मावळातील अनेक गावे!जेथे त्यांनी कीर्तनातून हजारो अभंगांची रचना करुन जगाला पंचमवेदाची गाथा रुपी भेट दिली.आणि हाच उपदेश शिरसावंद्य मानून सुमारे चारशे वर्षांहून अधिक काळ भक्तीचा मळा या मावळ शिवारात दिवसेंदिवस फुलत चालला आहे.या भक्तीतून सिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रसन्न मन आणि निरोगी शरीराचीही तेवढीच गरज आहे कारण मन करा रे प्रसन्न।सर्व सिद्धीचे कारण।।
  ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी मावळच्या भूमीतील थोरामोठ्यांचे मन व शरीर आरोग्यसंपन्न-सुदृढ राहीले पाहीजे हे दूरदृष्टीने हेरुन आणि गोरगरिबांना सहजतेने उपलब्ध न होणारी आरोग्यसेवा मोफत मिळाली पाहीजे हा ध्यास घेऊन मावळचे सुपुत्र आणि माजी राज्यमंत्री मा.संजय(बाळा)विश्वनाथराव भेगडे यांनी जानेवारी २०१८ मध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले.त्यादरम्यान शिबिराचे मुख्य संयोजक डॉ.ताराचंद कराळे यांचा आरोग्य सहाय्यक म्हणून काम करण्याची जबाबदारी नवनाथ बोडके यांच्या वर पडली.ती जबाबदारी उत्तम रित्या पार पाडली व आरोग्य सहाय्यक ते आरोग्य मित्र हा थक्क करणारा प्रवास कमी वयात पूर्ण केला.या कामाची आवड व गोडी लागली. रुग्णाचे दुख त्याला होणार त्रास बघितला की त्याच्या मनाला वेदना होयच्या त्या वेदना त्याच्या स्वतच्या आहे आसे मानुन त्यांच्या दुखःवर फुंकर मारण्याचा प्रयत्न त्याने सुरु केले ,आता तो स्वताचा राहिला नाही सतत कोणचा तरी फोन येतो व सांगतो मला हा आजार आहे व माझ्या कडे पैसे नाही मग हे रुग्ण ससून हॉस्पिटल, डी.वाय.पाटिल हॉस्पिटल सारखी सरकारी रुग्णालयात किवा पुण्यातील मोठी खाजगी हॉस्पिटल, स्टार हॉस्पिटल किवा सोमटने फाटा वरिल पायोनियर हॉस्पिटल अश्या हॉस्पिटल मधे नेवूण त्यांच्या वर माफक दरात चांगले उपचार करुन देन्याच काम करु लागला.या भव्यदिव्य आरोग्य शिबिरात सुमारे एक लाख रुग्णांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.त्यापैकी सत्तर हजार रुग्णांनी प्राथमिक उपचारही घेतले परंतु खरी कसोटी होती ती प्राथमिक तपासणीमधून निष्पन्न झालेल्या हजारो रुग्णांच्या आवश्यक शस्त्रक्रिया करून त्यांना उत्तम आरोग्यसेवा देण्याची! 
   मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी ही जबाबदारी डॉ.ताराचंद कराळे व नवनाथ बोडके आणि त्यांच्या टीमवर सोपवली.नवनाथजींना महाआरोग्य शिबिराच्या प्राथमिक तपासणीसाठी तालुक्यातील २० उपकेंद्र आणि तळेगावातील मुख्य केंद्रावर केलेल्या कामातून आरोग्य सेवेची आवड निर्माण झाली होती.अनेक रुग्णांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया,दिव्यांगांना त्यांचे दिव्यांगत्वाचे दाखले काढून देणे,अपघातातून निर्माण झालेल्या शारीरिक इजांवरील उपचार,मेंदुची शस्त्रक्रिया,अर्धांगवायू,मणक्याचे विकार,मुतखड्याच्या रुग्णांवरील उपचार,ह्रदयरोग उपचार,अॅंजोग्राफी,एम.आर.आय.,सी.टी.स्कॅन,एक्स रे अशा विविध तपासण्या रुग्णांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठीचा पाठपुरावा यासाठी नवनाथ बोडके यांनी अहोरात्र कष्ट घेत आहेत.शेकडो गरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचार खर्च मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. काही कुटुंबातील लोकांना मोफत उपचार हवे असतात परंतु रुग्णाची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात थांबणे त्यांना जिकीरीचे वाटते अशा वेळी त्या रुग्णाला मानसिक आधार देत त्या रुग्णाचा नातेवाईक म्हणून राहण्याच्या अनेक प्रसंगातून नवनाथ यांना जावे लागले.जानेवारी २०१८ ते आज ऑगस्ट २०२1 पर्यंत हजारो गरजू रुग्णांना नवनाथ हे देवदूत म्हणून लाभले आहेत. 
   २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघात राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांचा आकस्मिक पराभव झाला तरीही जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।। या शिकवणीने नवनाथ बोडके हे शेकडो गरजवंतांना उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. सशक्त मावळ समर्थ मावळ चे स्वप्न साकारण्यात त्यांचा निश्चितच सिंहाचा वाटा आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.
ऑगस्ट 2018 मधे केरळ मधील महापूर मधे आठ दिवस तेथील रुग्णाची सेवा करायची संधी भेटली. मे 2019 मधे ओरिसा मधे चक्रिवादळआल्या वर तेथे आठ दिवस व ऑगस्ट 2019 ला आलेला सांगली कोल्हापुर मधील महापूर या ठिकाणी पाच दिवस रुग्णसेवेचे काम केले. चिपळूण महापुरात 6 काम केले दिवस सलग तीन वर्ष आळंदी ते पंढरपूर पायी जाणाऱ्या रुग्णाची पण सेवा करायला मिळाली.करोना सारख्या ‌संकटकाळी रात्री अहोरात्री असंख्य रुग्णांना ‌बेड उपलब्ध करून दिले आज संपूर्ण महाराष्ट्रातुन त्याचा मित्र परिवार त्याच्या विश्वासावर रुग्णांना उपचारासाठी पुणे मध्ये पाठवतात   
रुग्ण्सेवेच व्रत घेतलेल्या या माणसा तील माणसाला सर्व रुग्ण व त्याच्या नातेवाईका कडुन मानाचा सलाम. आरोग्या च्या या महायज्ञ मधे तू तुझ्या आयुष्या तील वेळ व स्वप्नाची आहुती दिली व त्या यज्ञ ची फ़लप्राप्ती म्हणजे रुग्णाला चांगले आरोग्य, नवनाथ ने शेवटी हेच सांगितले की आरोग्या चा महायज्ञ आसाच तेजोमय राहिल व अनेक रुग्णाना याचा लाभ मिळण्या साठी प्रयत्न करत राहणार.


नवनाथ बोडके 9604784892

Share

Other News