ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

भगतसिंग हे नाव नाही तर एक विचार*  नायक दीपचंद यांचे देवळाली जयंतीप्रसंगी प्रतिपादन 


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 9/27/2021 8:56:46 PM

*भगतसिंग हे नाव नाही तर एक विचार*  नायक दीपचंद यांचे देवळाली जयंतीप्रसंगी प्रतिपादन *देवळाली कॅम्प:-* खरे हिरो कसे दिसतात हे जर कोणी विचारलं तर शहीद भगतसिंग यांचा फोटो त्यांना दाखवा कारण भगतसिंग हे केवळ एक नाव नसून तो एक विचार असल्याचे प्रतिपादन आदर्श सैनिक फाऊंडेशनचे अध्यक्ष नायक दीपचंद यांनी केले.    लामरोड येथे आदर्श सैनिक फाउंडेशनच्या वतीने ११४ वी जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली त्याप्रसंगी दिपचंद बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी वाशी येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर कुमार, अनिता सिंग, जीव रक्षक गोविंद तुपे वीर पिता श्रीकृष्ण बोडके वीर माता कृष्णाबाई बोडके,वीरपत्नी रेखा खैरनार, वीर माता मुन्नीदेवी मिश्रा यांच्या हस्ते भारत माता व शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकातून सेवानिवृत्त लष्करी अधिकारी विजय कातोरे यांनी संस्थेच्या उपक्रमांसह कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रशांत धिवंदे तर आभार रवींद्र शार्दुल यांनी मानले.

Share

Other News