ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कुपवाडचा प्रमुख रस्ता डांबरीकरणातुन वगळला , सामान्य नागरिकांतुन संताप...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/27/2021 9:06:29 AM

   

कुपवाड/ दि २६,
     दिवाळीनंतर सांगली, मिरजमधील प्रमुख रस्ते चकाचक होणार असले तरी कुपवाडमधील मुख्य रस्त्याचा समावेश मात्र त्यात का नाही असा खडा सवाल सामान्य जनतेमधून विचारला जात आहे. कुपवाड ला नेहमी विकासकामाबाबत'सवती' ची वागणुक का ? असा प्रश्न सामान्य मायबाप जनता विचारु लागले आहेत.
     वास्तविक पहात कुपवाडकर प्रशासनाचे सर्व कर भरण्यात आघाडीवर आहेत. सर्व कर भरूनही विकास कामाच्या वेळी कुपवाड चा विचार केला  जात नाही . हे असे किती दिवस चालणार... 
     कुपवाड च्या मुख्य रस्त्याची चाळण झाली असताना देखील कुपवाड च्या मुख्य रस्त्याचा डांबरीकरण मध्ये समावेश केला गेला नाही आहे,
कुपवाड शहराला नेहमी प्रमाणे डावलण्यात आले आहे,
महापालिकेला कुपवाड च्या विकासाशी काही घेणे देणे नसेल तर ,
कृपया कुपवाड च्या नागरिकांकडे कर आकारणी साठी येऊ नये, अश्या संतप्त भावना जनतेमधून व्यक्त होत आहेत. कुपवाड ला कोणी वाली आहे का नाही? , असे प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.कुपवाड मनपामध्ये आहे की नाही, तसे असेलतर सरळ कुपवाडची ग्रामपंचायत करा , अश्या भावनाही सामान्य जनतेतून व्यक्त होत आहेत.

Share

Other News