ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविण्यपूर्ण योजनांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याकरीता मुदतवाढ


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 1/17/2022 5:55:02 PM
गडचिरोली,(जिमाका)दि.17: नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट  पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबविण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांची या योजनेंतर्गत निवड करण्यात आली आहे (प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह), अशा लाभार्थ्यांनी,  दि.12 जानेवारी 2022 (सकाळी 10.00 पासून) ते दि. 16 जानेवारी 2022 (रात्री 12.00वा. पर्यंत) या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.
लाभार्थ्यांनी ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने निवड झालेल्या व प्रतिक्षाधीन लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधेस दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 
निवड झालेल्या (प्रतीक्ष यादीतील लाभार्थ्यांसह) लाभार्थ्यांनी दि.19 जानेवारी 2022 रात्री 12.00वा. पर्यत या विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड करण्याची संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरण्यसाठी संकेतस्थळ पुढील प्रमाणे आहे - https://ah.mahabms.com, अँड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव- AH-MAHABMS (google play store), कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कालावधी- दि.12 जानेवारी 2022 (सकाळी 10.00 पासून) ते दि.19 जानेवारी 2022 (रात्री 12.00 वा.पर्यंत) राहील. 
****

Share

Other News