सांगली हिताचा निर्णय , पदमभूषण वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयासाठी 234 कोटी रु मंजुर...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/06/2022 10:52 AM


    सांगली सिव्हील हॉस्पिटलच्या ठिकाणी नव्याने ५०० खाटांची सोय असलेली अध्यावत चार मजली इमारत उभी करण्यात यावी, त्याचबरोबर निवासी डॉक्टरांसाठी तीन मजली इमारत आणि अध्यावत शवागाराची गरजही पूर्ण करावी अशी मागणी घेऊन आपण ना. देशमुख यांची मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष भेट घेतली होती, आणि सिव्हिल हॉस्पिटलमधल्या अडचणी सविस्तरपणे मांडल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्रासाठी असलेल्या या हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील रुग्णही मोठ्या संख्येने येतात. कोरोना काळात तर या हॉस्पिटलवर खूप मोठा ताण पडला. यंत्रणा अपुरी पडू लागली, त्यामुळेच या हॉस्पिटलचे अद्ययावतीकरण झाले पाहिजे, त्यासाठी संबंधित विभागाची बैठक लावण्यात यावी अशी मागणी केली होती.

या भेटीनंतर ना. देशमुख यांनी दि. २३/११/२०२१ रोजी एक तातडीची बैठक घेतली. बैठकीला मी स्वतः, तसेच वैद्यकीय शिक्षण सचिव, मिरज मेडिकल कॉलेजचे डीन आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी नव्या हॉस्पिटलसाठी परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले. त्यानुसार मी स्वतः तसेच हॉस्पिटलचे अधिष्ठाता, मिरजेच्या मेडिकल कॉलेजचे डीन आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता यांनी चर्चा करून प्रस्ताव तयार केला आणि तो त्यांच्याकडे पाठवला.

हा प्रस्ताव पाठवल्यानंतर मंत्री महोदयांनी आणखी एक बैठक घेतली. त्यावेळी प्रस्तावात काही सुधारणा सुचवण्यात आल्या. त्यातील त्रुटी दूर करून परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्यात आला. नंतर तो मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडे पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर  मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला आणि त्यासाठीच्या खर्चाला तत्वतः मंजुरी मिळाली.

या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी मी गेले चार महिने ना. देशमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळेच या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली. आता लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण करून सध्याच्या हॉस्पिटल जवळ असलेल्या मोकळ्या जागेत नव्या सिव्हिल हॉस्पिटलचे बांधकाम सुरू होईल, आणि अध्यावत इमारत उभी राहील. साधारणपणे ५२ हजार, ६७३ स्क्वेअर मीटरचे बांधकाम होणार आहे. या हॉस्पिटलमुळे पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांची, तसेच कर्नाटकातील रुग्णांचीही मोठी सोय होणार आहे.

सांगली आणि अन्य जिल्ह्यांसाठी आवश्यक असलेल्या या हॉस्पिटलचे काम त्वरित मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांचे समस्त सांगलीकरांच्यावतीने मनःपूर्वक आभार! नव्या हॉस्पिटलच्या कामासाठी पालकमंत्री ना. जयंत पाटील आणि कृषी व सहकार राज्यमंत्री ना. विश्‍वजित कदम यांचेही मोठे सहकार्य लाभले. त्यांचेही मनःपूर्वक आभार!

Share

Other News

ताज्या बातम्या