पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत 26.16 लाख लाभार्थ्यांना लाभ. - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

  • YUNUS KHATIB (Pimpri Chinchwad )
  • Upadted: 30/06/2020 8:04 PM

पुणे, दि. 30 - पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे जून 2020 महिन्याचे नियमित मंजूर 66 हजार 574.22 मे.टन असून आजअखेर 66 हजार 178.8 मे टन (99.41 %) धान्याची उचल झालेली आहे. त्यापैकी नियमित धान्य वितरण 92.32 % आहे. याअंतर्गत एकूण 26 .16 लाख लाभार्थ्यांना 61 हजार 460 मे.टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे. पुणे विभागात 29 जून 2020 रोजी एकूण 206 शिवभोजन केंद्र असून सर्व सुरू आहेत. यामध्ये 21 हजार 432 गरजूंनी लाभ घेतला आहे. पुणे विभागामध्ये जिवनावश्यक वस्तुंचा तसेच औषधांचा तुटवडा नसल्याचेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या