सांगली - मिरज सुस्थितीतील रस्ता पुन्हा करण्याचे काम चालू, ठेकेदारासाठी खटाटोप?.

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/05/2024 10:12 PM

सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कडून मिरज-सांगली रस्त्याचे डांबरीकरण होत आहे. मुळात हा रस्ता 95 टक्के सुस्थितीत असताना पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करून केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठी आणि टक्केवारी घशात घालण्यासाठी हा खटाटोप सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत आहे.
मुळात मिरज-सांगली रस्त्यावरील वाहतूक पाहता हा रस्ता आणखीन दुपदरीकरण म्हणजे सहा पदरीकरण करणे अत्यावश्यक आहे. यासाठी रस्त्याशेजारील काही खासगी मिळकत संपादित करावी लागणार आहे. यावर खर्च करणे अपेक्षित असताना केवळ टक्केवारीसाठी रस्त्यावर थरावर थर चढवून ठेकेदार आणि अधिकारी यांच्या "बिल्डिंग" मजले वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे...😡😡

*आपल्या सर्वांची... मिरज सुधार समिती. 


Share

Other News

ताज्या बातम्या