🔺 🔺 कु. ट्विंकल गोहणे ला गोंडवाना विद्यापीठाचे सुवर्ण पदक
🔺 वणी तालुक्यातील केसुर्ली गावाची कन्या
वणी :
गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात सन २०२४-२५ या वर्षी झालेल्या एल एल बी च्या अंतिम परीक्षेत हिंदू कायदा या विषयात सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या कु. ट्विंकल सुधाकर गोहणे हिला गडचिरोली येथे विशेष तेराव्या दीक्षांत समारंभात मान्यवरांचा उपस्थितीत दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कु. ट्विंकल गोहणे ही तालुक्यातील केसुर्ली या लहान खेड्या गावातील असून एका शेतकरी कुटुंबातील लहानपणीच वडिलांचे छत्र हरविलेल्या आणि शेतकरी आईचा कष्टाचे फळ पदरात टाकणारी कन्या असून तिचा या कामगिरीचे केसुर्ली गावातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
कु ट्विंकल गोहणे ही आपल्या यशाचे श्रेय आपली आई अलका सुधाकर गोहणे, भाऊ ओमकार सुधाकर गोहणे, परिवार व शिक्षकांना देते. ट्विंकल गोहणे ही सध्या वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात अधिवक्ता अविनाश बोधाने यांचे कडे सहायक अधिवक्ता म्हणून प्रॅक्टिस करीत आहे. तिला मिळालेल्या यशाला ॲड. अविनाश बोधाने, ॲड. कुमार मोहरमपुरी, अतुल पायघन आदींकडून अभिनंदन करण्यात येत आहे.