नांदेड :- हदगाव तालुक्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्षपदी विशाल घोडेकर, उपाध्यक्षपदी चंद्रकांत सोनटक्के, शहराध्यक्षपदी प्रदीप सोनसळे, सचिवपदी ज्ञानेश्वर गोडसे, कोषाध्यक्षपदी अमोल गंगासागर तर संघटकपदी वैभव सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड ,तसेच मराठवाडा संघटक गोविंद माऊली पार्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. यावेळी समाज संघटन बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास संभा खंदारे, दिलीप गंधारे, पांडुरंग देशमाने, बालाजी सूर्यवंशी, बालाजी खंदारे, विलास सूर्यवंशी, टी. पी. गायकवाड, गजानन वानखेडे, बाबुराव गंधारे, घोडसे पेंटर, आशुतोष खंदारे, इटकरे, माहूरकर यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.हदगाव येथे दिनांक ८ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याने समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नूतन पदाधिकाऱ्यांकडून समाजहितासाठी प्रभावी कार्य केले जाईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.