नांदेड :- नांदेड येथील स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठतील ११ विद्यार्थ्यांचा एक गट आणि तीन शैक्षणिक कर्मचारी
‘अन्वेषण २०२५’ या राष्ट्रीय संशोधन आणि नाविन्य स्पर्धेच्या पश्चिम विभाग
फेरीसाठी आज सकाळी गुजरात रवाना झाले. सरदार पटेल विद्यापीठ, वल्लभ विद्यानगर येथे १९ ते २१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये
विशाल वाडेकर, आचल मुलगिर, सोफिया पठाण, अस्मिता इंगळे, गौतम दुर्गम, वैष्णवी
मलवाड, वैष्णवी हेसे,
गीतांजली अदाबे, स्वप्नील कांबळे, आदित्य मुदिराज आणि यश जंभुळकर यांचा समावेश आहे. विद्यार्थी संघाचे मार्गदर्शन प्रा. डॉ. एच. एस. फडेवार, शंकर हंबर्डे आणि प्रा. विद्या कापसे करीत आहेत. संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व नाविन्य, इन्क्युबेशन आणि
लिंकेजेसचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांच्याकडे आहे. विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, डीन डॉ. एम. के. पाटील आणि
आय.क्यू.ए.सी.चे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
आहेत.‘अन्वेषण’
स्पर्धेचे स्वरूप भारतीय विद्यापीठ संघटनेने (एआययू) २००७ पासून सुरू
केलेली ही प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती आणि नाविन्याची
क्षमता विकसित करण्यासाठी आयोजित केली जाते. उत्कृष्ट संघांना रोख पारितोषिके,
प्रमाणपत्रे आणि सुवर्णपदके प्रदान केली जातात. यावर्षी पश्चिम विभाग
फेरी सरदार पटेल विद्यापीठात होत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे
हे तरुण संशोधक राष्ट्रीय मंचावर आपल्या प्रकल्प सादर करणार आहेत.