विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री.प्रदीप कामले यांनी पूर्णा रेल्वे स्थानकावर केली पाहणी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/01/2026 5:42 PM

नांदेड :- नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी बुधवार, दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पूर्णा रेल्वे स्थानकास तपासणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रेल्वेच्या विविध महत्त्वाच्या सुविधा तसेच सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान श्री. कामले यांनी पूर्णा येथील क्रू लॉबी व रनिंग रूमची तपासणी करून कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा, स्वच्छता व कार्यपद्धतीचा आढावा घेतला. तसेच अपघात निवारणासाठी सज्ज असलेल्या ART (अपघात मदत गाडी) आणि SPMRV (स्वयंप्रेरित वैद्यकीय मदत वाहन) यांच्या स्थितीची पाहणी करून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
याशिवाय, पूर्णा रेल्वे स्थानकावर ‘अमृत स्टेशन’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यात आली. प्रवाशांच्या सोयीसुविधा, कामांची गुणवत्ता व प्रगती यांचा आढावा घेत कामे वेळेत व दर्जेदाररीत्या पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या दौऱ्यावेळी नांदेड विभागातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नांदेड विभाग प्रवासी सुविधा, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या