महाराष्ट्र राज्य ज्युनिअर अँथलेटीक स्पर्धेत भैरवनाथ स्पोर्टसच्या ३ खेळाइंची सुवर्णपदकाला गवसणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/08/2026 3:32 PM

डेरवण चिपळूण येथे सुरू असलेल्या 40 व्या महाराष्ट्र स्टेट जुनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये बामणोली च्या श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन बामणोली च्या खेळाडूंना तीन सुवर्णपदक मिळवले.
 20 वर्ष गटात कु सुयोग पंडित सोलंकर बांबू उडी या क्रीडा प्रकारात 3:70 मीटर उंच उडी मारून सुवर्णपदक पटकावले, 20 वर्षे वयोगटात कु.साहिल किरण साबळे यांनी 5 किलोमीटर चालणे क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले तसेच 18 वर्ष गटामध्ये कु ऋतुजा रामचंद्र माने ही सुवर्णपदक पटकावले या तिघांची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल सांगली जिल्हा अथलेटिक्स  सचिव श्री संजय पाटील सर व प्रशिक्षक परशराम (प्रशांत) बामणे , उद्योजक श्री सतीश मालू, सांगली जिल्हा टीम मॅनेजर श्री प्रमोद सर, यांच्याकडून त्यांचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या