कुपवाड–मिरज मुख्य रस्त्यावरील पुलावर मोठमोठे खड्डे पडले होते तसेच पुलाच्या बाजूचे संरक्षक कठडे खराब झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
याबाबत परिवहन सभापती नगरसेवक मा.प्रकाश पाटील व संघर्ष समितीचे अध्यक्ष मा.सनी धोतरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग PWD, मिरज यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत आज पुलावरील खड्डे बुजविणे व संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. तसेच कुपवाड–मिरज रस्त्यावरील इतर खड्डे बुजविण्याचे कामही सुरू आहे.
यावेळी मा.पै.राजू पाटील, मा.सुरेश साखळकर, पत्रकार मा.बाळासाहेब मलमे,मा.श्रीकृष्ण कोकरे,मा.आदम पठाण, मा.पैगंबर शेख व मा.धनाजी सरगर उपस्थित होते.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश!