सौ आशालता उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विदयालय कुपवाडने जवांनासाठी राबवली " विशेष राखी " मोहीम

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/08/2026 10:10 PM

देशाच्या रक्षणासाठी स्वतःचे घरदार कुटुंब आणि सण, उत्सव सोडून सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या फौजी भावांसाठी यंदाचे रक्षाबंधन विशेष ठरणार आहे. "रक्ताचे नाते नसले तरी देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानांशी आमचे एक अतूट नाते आहे" याच भावनेतून कुपवाड मधील सौ आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड मधील   विद्यार्थिनींनी कला व कार्यानुभव विषय अंतर्गत सैनिकांसाठी स्वतः हाताने विविध रंगी, वेगवेगळया वस्तूंचा वापर करून  तयार  केलेल्या  *विशेष राख्या* मोहीम राबवली. सदर तयार केलेल्या राख्या आपल्या सैनिक बंधू साठी  पाठविण्यात आल्या. या राख्या(एम.सी.एफ लिडर व इनचार्ज) श्री.प्रकाश कदम सर व त्यांची टीम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय उपाध्ये सर,उपाध्यक्ष सुरज सर,सचिव रितेश सर, संचालिका कांचन मॅडम,  शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या