नगर-पाथर्डी रोडवर भीषण अपघात; ॲक्टीव्हा चालकाचा जागीच मृत्यू सफारीच्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर; वाहनावरील ‘पोलीस’ पाटी आणि डॅशबोर्डवरील टोपीमुळे प्रश्नचिन्ह

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 31/08/2026 7:38 PM

प्रतिनिधी राविकुमार शिंदे 

अहिल्यानगर : भिंगार परिसरातील नगर-पाथर्डी रोडवरील बाराबाभळी येथील महेश नगर चौकात रविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता भीषण अपघात झाला. पाथर्डीच्या दिशेने येणाऱ्या सफारी कारने रस्त्यालगत असलेल्या ॲक्टीव्हा दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मृत दुचाकीस्वार केकती गावातील रहिवासी असल्याचे समजते. मात्र, मृताची अधिकृत ओळख आणि अपघाताचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

धडक एवढी जोरदार होती की रस्त्यालगतचा लोखंडी बोर्ड तुटला, तर ॲक्टीव्हा दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.

दरम्यान, संबंधित सफारी कारवर ‘पोलीस’ असा उल्लेख असलेली पाटी दिसून आली. तसेच डॅशबोर्डवर पोलीस अधिकाऱ्याची टोपी ठेवलेली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे वाहनावरील ही पाटी अधिकृत होती का, वाहन कोणाच्या मालकीचे आहे आणि पोलीस टोपीचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या सर्व बाबींची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताचे नेमके कारण आणि वाहनावरील ‘पोलीस’ पाटीबाबतचे वास्तव पोलिस तपासातून स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

#अहिल्यानगर #नगरपाथर्डीरोड #अपघात #भिंगार #पोलीस

Share

Other News

ताज्या बातम्या