ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

नीट च्या परीक्षेत वैभव नैताम याचे सुयश


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 10/17/2020 8:53:55 PM


गडचिरोली - आशिष अग्रवाल

               नुकताच जाहीर झालेल्या नीट च्या परीक्षेत गडचिरोली येथील वैभव नैताम यांनी 720 गुणांपैकी 614 मार्क घेऊन घवघवित यश प्राप्त केले आहे. वैभव शिवसेनेचे तालुका अध्यक्ष गजानन नैताम यांचा मुलगा. वैभव यांनी आपले बारावीपर्यंतचे शिक्षण रामनगर येथील प्राथमिक शाळेत पूर्ण केले असुन तो आता एम बी बी एस करणार आहे व पूढे त्याला आय पी एस अधिकारी बनायचे असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या यशाबद्दल नगरसेवक संजय मेश्राम, माजी नगरसेवक तथा माजी सभापती अजय भांडेकर, सामाजिक कार्यकर्ता किशोर भांडेकर यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वैभव याचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

Other News