ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरप्रमुख अमोल पाटील व संजीवनी हॉस्पीटल यांच्या वतीने बामणोली येथे फळवाटप व आरोग्यतपासणी शिबिर संपन्न


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 1/23/2021 2:09:24 PM

      


        हिंदुह्रदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी,शिवसेना कुपवाड शहर प्रमुख अमोल पाटील आणि संजीवनी मल्टी केअर हॉस्पिटल यांच्या वतीने प्रभाततारा मुलींचे बालगृह,बामणोली येथे आरोग्य तपासणी आणि फळवाटप करण्यात आले. 
              सन्मानीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार आरोग्य शिबीर,फळ वाटप अशा समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्याचे आव्हान केले होते. त्यानुसार बाळासाहेबांच्या फोटो ला जिल्हाप्रमुख  संजय विभुते यांच्या हस्ते हार अर्पण करून आरोग्य शिबिराचे सुरुवात करण्यात करण्यात आले.यावेळी प्रभात तारा मुलींच्या बालगृहातील सर्व मुलींचे आरोग्य तपासणी करण्यात आले तर ज्या मुलींना औषधाची गरज लागले आहे त्यांना औषध वाटप करण्यात आले.  
      उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर ,शहर प्रमुख हरिदास लेंगरे यांच्या हस्ते सर्व मुलींना फळ वाटप करण्यात आले. 
           संजीवनी हॉस्पिटलकडून डॉक्टर पूजा चंदनशिवे, प्रतिभा गिरी यांनी तपासणी केली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमोल पाटील,विभाग प्रमुख सिद्धार्थ चौगुले, प्रमोद जाधव, शुभम तपासे उपस्थीत होते तर दत्ता शेंडगे यांनी संयोजन केले.

Share

Other News