भारतीय माहिती अधिकार न्यूज नेटवर्क गडचिरोलीचे तालुका प्रतिनिधी यांनी घेतली covid-19 ची लस

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 19/04/2021 6:30 PM

गडचिरोली :- 

            संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूने गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा थैमान घातला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. या कोरोना विषाणू चा शिरकाव कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत. परंतु नागरिकांनी स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी स्वतः घेऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.जेणेकरून या विषाणूला आळा घालण्यास मदत होईल.जसे कुणीही विनाकारण घराबाहेर निघू नये, महत्त्वाच्या कामाला जाताना मास्क लावूनच घराबाहेर पडावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सतत हात धुत राहणे, तसेच वय वर्ष 45 व त्याच्या वरच्या प्रत्येक नागरिकांनी स्वतःची जबाबदारी समजून जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे. यालाच अनुसरून भारतीय माहिती अधिकार न्यूज नेटवर्क गडचिरोलीचे तालुका प्रतिनिधी राजेश नाथानी यांनी covid-19 ची लस घेतली व घेतल्यानंतर सुद्धा या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन नाथानी यांनी लस घेतल्यानंतर केले.







निखील राखडे (गडचिरोली जिल्हा मुख्य प्रतिनिधी)
९४०५२२८७८७

Share

Other News

ताज्या बातम्या