ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कोरोना विषाणु साथिच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असल्याने सामाजिक संवेदना आणि कर्तव्याचा भाग म्हणुन रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे - सामाजिक कार्यकर्ता समीर मदारी


  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 5/13/2021 9:51:30 PM

कोरोना विषाणु साथिच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असल्याने सामाजिक संवेदना आणि कर्तव्याचा भाग म्हणुन रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता व नगराध्यक्ष समर्थक समीर मदारी यानी केले आहे.

चंद्र दर्शनानुसार परांड्यासह सर्वत्र 14 तारखेला ईद साजरी करण्यात येण्याची शक्यता आहे.रोज्यांमध्ये सुर्योदयापुर्वि खाणे(सहेरी)अपेक्षित आहे, तर सुर्योदयानंतर जेवन(इफ्तार) करण्याची परवानगी आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात केलेले सर्व रोजे ईदच्या दिवशी सोडले जातात. दर वर्षी सगे सोयरे, मित्र परिवार, शेजार्यांसमवेत मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी ईद यावर्षी मागील वर्षांप्रमाणे साजरी करावी.

मागील एक वर्षापेक्षा जास्त काळापासून कोरोनाच्या महामारीने बिकट परिस्थितीने संपूर्ण जगभरामध्ये तसेच आपल्या भारत देशात महाराष्ट्रात कोरोना संसर्गाने हैदोस घातलेला आहे हा कोरोना रोग संसर्गाने वाढत असल्यामुळे व मागील वर्षांपेक्षा या रोगाने चालू काळात आपणास आपले जवळचे नातेवाईक व सहकारी मित्र गमवावे लागत आहेत.
सध्याचे काळात हाॅस्पिटल मध्ये उपचाराकरीता बेड, उपचाराची उपकरणे,औषधे अवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत हे आपण सर्वजण अनुभवत आहोत. प्रशासन नाना तर्‍हेचे प्रयत्न करून कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने दिलेले नियमांचे व सुचनांचे पालन करत तसेच आपल्या तोंडाला मास्क किंवा रुमाल लावून जेणेकरून या कोरोनासंसर्गाचा फैलाव होणार नाही याची काळजी आपण सर्व मुस्लिम बांधवांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
सामाजिक बांधीलकी जपणारा व प्रशासनास पूर्ण सहकार्य करणारा समाज म्हणून मुस्लिम समाजाकडे बघण्याचा असलेला दृष्टिकोन समाज बाधवांनी जपावा व सामाजिक भान राखत आपल्याच घरी नमाज पठण करावी व साधेपणाने ईद साजरी करावी. सर्वांच्या दिर्घायुष्यासाठी दुआ प्रार्थना करावी असे आवाहन समीर मदारी यांनी केले आहे.
रमजान महिन्याच्या काळात मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण न करता घरीच नमाज पठण करुन देशातील मुस्लिम बांधवांनी जे जबाबदारीचे पालन केले आहे तसेच शिस्तिचे पालन ईदच्या दिवशी करावे असे आवाहन मुजम्मील काझी यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे. तसेच तमाम हिंदु मुस्लिम बांधवांना रमजान ईद सणाच्या शुभेच्छा व्यक्त करतो

Share

Other News