ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

१ हजाराची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 5/20/2022 10:44:56 PM
*जळगाव :* एक हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे.

इयत्ता १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर निकालाचे गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेटवर विद्यार्थ्याच्या आईचे नाव चुकीचे आले होते.
 या दोन्ही प्रमाणपत्रांवरील नावाची दुरुस्ती करून देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापकाने १ हजारांची लाचेची मागणी केली. त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. राजेंद्र भास्करराव पाटील 
 (५५, रा. भगवती हौसिंग सोसायटी, चाळीसगाव) 
असं लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. 
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात  गुन्हा  दाखल झाला आहे.

तरवाडे (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद)
 येथील फिर्यादींचा मुलगा कविवर्य श्री ना. धों. महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव येथे सन २०२१मध्ये १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. 
या निकालाचे प्रमाणपत्र व बोर्ड सर्टिफिकेटवर विद्यार्थ्याच्या आईचे नाव चुकीचे छापून आले होते. 
या दोन्ही प्रमाणपत्रांवरील नाव दुरुस्ती करून देण्याच्या मोबदल्यात फिर्यादीकडे मुख्याध्यापक पाटील यांनी १ हजारांची लाच मागितली होती.

त्यानंतर  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  सापळा रचला. 
मुख्याध्यापक पाटील यांस त्यांच्या राहते घरी लाच स्वीकारताना अटक  करण्यात आली आहे.
 सदरची कारवाई ए.सी.बी. पथकाचे उपअधीक्षक शशिकांत पाटील ,
 पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव  यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.

Share

Other News