ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

केंद्रीय फुड विभागाची लॅब सांगलीत व्हावी , व्यापारी व छोटया उध्योजकांची मागणी


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 3/21/2023 8:05:59 AM

केंद्रीय फूड विभागाच्या एनएबीएल लॅब पुणे यांच्या कडून दर सहा महिन्यांनी तपासणी प्रमाणपत्र सादर करण्याच्या जाचक अटी व कायद्या विरोधात बेकरी, डेअरी चालक, ऍग्रो बेसिक चे इंडस्ट्री चालक यांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना निवेदन दिले. या जाचक अटीचे आदेश रद्द करावेत व सर्वसामान्य आणि छोट्या व्यावसायिक धारकांना खर्चिक असलेल्या तपासणी बाबत पुण्याला जावे लागते तसेच प्रत्येक 6 महिन्याच्या तपासणी करिता 9 ते 25 हजाराच्या आसपास खर्च असल्याने सर्व व्यापाऱ्यांना व छोटे उद्योगांना हा खर्च फार मोठा होत आहे त्यामुळे सदर लॅब सांगली जिल्ह्यात व्हावी व या तपासणीचा खर्च कमी करण्यात यावा अशी मागणी असोसिएशनच्या मार्फत करण्यात आली याबाबत मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडवणीस तसेच अन्न व औषध मंत्री ना. संजय राठोड यांना पत्र देऊन केंद्रीय फूड विभागाच्या अटीमध्ये शिथिलता आणण्याबाबत प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक संतोष पाटील, गजेंद्र कल्लोळी, बेकरी असोसिएशनचे फिरोज अप्पी, नवीद मुजावर स्वीट असोसिएशनचे नितीन चोगुले, मंदार कुंभोजकर, मिल्क असोसिएशनचे चेतन दडगे, शरद कुलकर्णी. चहा असोसिएशनचे सिद्धार्थ मगदूम, राजेश शहा, चंद्रकांत पाटील, ओंकार दांडेकर आदी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते...

Share

Other News