प्रति
मा. आयुक्त
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
विषय: - सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका विद्युत विभाग मुख्यालय जाहीर प्रकटन क्रमांक 6 /2025-2026 शर्ती अटी बाबत
महोदय,
आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका विद्युत विभाग मुख्यालय जाहीर प्रकटन क्रमांक 6/2025-2026 विद्युत विभागाची कामे काढण्यात आलेले आहेत
सदर टेंडर मध्ये 32 नंबरला शर्ती अटीमध्ये स्थळ पाहणी अहवाल ची आठ घातल्यात आली आहे. सदर शर्ती अटीमध्ये अशा पद्धतीने स्थळ पाणी अहवालाची मागणी ही शासकीय नियमाला अनुसरून नसून बेकायदेशीरपणाने आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी घालण्यात आली आहे.
त्यामुळे सदर कामाबाबत स्पर्धा होणार नसून रिंग करून काम मॅनेज करण्याचा उद्देश सरळ सरळ दिसून येत आहे.
सदर 32 नंबरची अट रद्द करून खुली स्पर्धा करण्यात यावी जेणेकरून महानगरपालिकेचा आर्थिक फायदा होणार आहे
त्वरित सदर आठ रद्द करण्यात यावी अशी विनंती आहे.
महानगरपालिकेचा कारभार करताना अथवा कोणतीही टेंडर प्रक्रिया राबवताना मनपाच्या आर्थिक हिताचा निर्णय घ्यावा अशी पुनश्च एकदा विनंती आहे.
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा